पीपल्स रिपब्लिकन पार्टी चे राज्य अधिवेशन संपन्न
- भुसावळ:पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे राज्य अधिवेशन ३ जून रोजी डी.एस.मैदानात पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष दलितमित्र गोपाळराव आटोटे गुरुजी यांच्या अध्यक्षतेखाली व राष्ट्रीय अध्यक्ष लॉंगमार्च प्रणेता प्रा.जोगेन्द्र कवाडे सर् यांच्या प्रमुख उपस्थीत पार पडले.
- या अधिवेशनाचे उदघाटन पक्षाचे गुजरात प्रदेशचे नेते सुरेश भाई सोनवणे यांनी केले स्वागताध्यक्ष भुसावळ नगरपालिकेचे नगर सेवक जगन भाई सोनवणे हे होते.या अधिवेशनाच्या पहिल्या सत्रात पक्षाचे धोरण व वाटचाली संधर्भात एकूण १६ ठराव घेण्यातआले ज्याचे वाचन विदर्भ प्रदेश अध्यक्ष चरणदास इंगोले यांनी अंतिम सत्रात केले
- दुसऱ्या सत्रात पक्षाचे ज्येष्ठ नेते आटोटे गुरुजी,अँड जे के नारायणे,थाँमस कांबळे,अशोक शहावानखडे,गणेशभाई उन्हवणे,पडघन गुरुजी,रत्नाताई मोहोड,भाई मिलिंद सुर्वे,बापूराव गजभारे,इत्यादीनी मार्गदर्शन केले व नंतर सुप्रसिध्द गायक आनंद शिंदे यांच्या (कानून भीमजी का)या सी डी चे विमोचन करण्यात आले या सीडी मध्ये प्रत्येक गाण्या पूर्वी कवाडें सरांच्या आवाजात निवेदन आहे.नंतर शिंदे यांच्या बहारदार भिमगीतांचा कार्यक्रम संपन्न झाला
- शेवटच्या सत्रात ज्या ऐतिहासिक मैदानात हे अधिवेशन होते तेथे डॉ बाबासाहेबांचे पदस्पर्श झाले होते.बाबासाहेबांची तेथे कामगारांची सभा झाली होती त्यामुळे पक्षाचे नगरसेवक भाई जगन सोनवणे यांनी पाठपुरावा करून नगर पालिकेत ठराव घेऊन त्या पावन भूमीला डॉ बाबासाहेब आंबेडकर मैदान असे नामकरण करून भुसावळ नगर पालिकेचे नगराध्यक्ष श्री नेमाडे यांनी कवाडे सरांच्या उपस्थितीत मैदानाचे लोकार्पण केले .
- शेवटी प्रा कवाडे सरांच्या मार्गदर्शनाने या अधिवेशनाची सांगता झाली ..
- या अधिवेशनाला महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यातील पदाधीकारी व कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने उपस्थित होते ..... Add caption
|
No comments:
Post a Comment